ग्लोबल एडिटर्स नेटवर्क परिषदेत पत्रकारितेशी संबंधित अनेक नवनवीन संकल्पनांवर व्यापक आणि रंजक विचारमंथन होत आहे.
ग्लोबल एडिटर्स नेटवर्क परिषदेत पत्रकारितेशी संबंधित अनेक नवनवीन संकल्पनांवर व्यापक आणि रंजक विचारमंथन होत आहे. जर्नलिस्ट्स ऑनलाइन (जेओएल) अर्थात जागतिक पत्रकारांचा ऑनलाइन अड्डा ही अशीच एक भन्नाट आयडिया. येथे गुरुवारी सायंकाळी ‘ग्लोबल न्यूज समिट’मध्ये जेओलचे शानदार उद्घाटन झाले. पॅरिसच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुंदर स्मारकाच्या साक्षीने हा सोहळा झाला. यावेळी साधारण ६०० संपादक आणि पत्रकारांना जेओएलचे खास वर्गणीदार बनवण्यात आले.जेओल म्हणजे पत्रकारांचे पहिलेवहिले जागतिक, व्यावसायिक नेटवर्क. म्हणजे काय? तर न्यूजरूममध्ये संपादकासमोर अचानक एखादी परिस्थिती उद्भवते. काही वेळा जगाच्या कोणत्या तरी कोप-यात घडलेल्या घटनेचा फोटो हवा असतो किंवा एखाद्या विषयातील तज्ज्ञाचे मत हवे असते.. काही वेळा संपादकीयेतर स्वरूपाच्या जबाबदा-याही उभ्या राहतात. या व अशा अनेक समस्यांचे निराकरण जेओएल सोशलच्या माध्यमातून होऊ शकते. किंबहुना, जेओएल सोशल हे आधुनिक संपादकाकडील नवे, बहुपयोगी साधन ठरू शकते. आजकाल ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘कनेक्ट’ राहणे हे फॅड राहिलेले नसून ती गरज बनली आहे.
जेओएल असेच एक विधायक नेटवर्क आहे. भागीदारी, संवादाच्या माध्यमातून देशांच्या सीमा ओलांडून पत्रकारांना, संपादकांना एकमेकांची मदत करता येणे हा जर्नलिस्ट्स ऑनलाइन सोशलचा उद्देश आहे. संपादकीय मजकूर, बातम्यांच्या देवाणघेवाणीपासून ते नोकरभर्तीपर्यंत अनेक क्षेत्रे यामुळे विविध देशांसाठी खुली होतील. सुरुवातीचे सहा महिने या नेटवर्कचे सब्सक्रिप्शन मोफत राहील. या काळात जेओएलची लोकप्रियता वाढीस लागेल हे नक्की.
Categories:
पॅरिस नगरीतून