
इसवी सन पहिल्या ते पंधराव्या शतकापर्यंत भारत अक्षरश: सुवर्णभूमी म्हणूनच ओळखला जात होता. येथील सुबत्ता आणि संपत्तीच्या सुरस कथांनी युरोपियन जग भारताकडे आकर्षित झाले. मायकल एडवर्ड्स यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ इंडिया’ या ग्रंथात पोर्तुगाल आणि इंग्लंडची पावले आपल्या देशाकडे कशी वळली, याचा सुरेख मागोवा घेतला आहे. एडवर्ड्स लिहितात, पंधराव्या शतकात पोर्तुगीज सत्ताधारी पोपच्या आशीर्वादाने