
मराठी वृत्तपत्रांमध्ये दिल्लीतील राजकीय घडामोडींपासून साहित्यिक हालचालींपर्यंतच्या सर्व क्षेत्रांविषयी एक नवी जाणीव निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांचे निधन ही त्यांच्या लिखाणावर प्रेम करणा-या प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी बातमी. विशेषत: सध्या ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि कंपूने राजकीय धुमाकूळ घातलाय. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात