
डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमी होत आलेली किंमत, हा सध्या सर्वच भारतीयांच्या चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक स्तरावर झालेल्या आर्थिक उलाढालींमुळे रुपया घसरला हे मान्य. परंतु १९४७ साली डॉलरच्या बरोबरीने असलेला रुपया जेव्हा स्वातंत्र्याला सहा दशके उलटल्यानंतर एक डॉलरला साठ रुपये होतो, तेव्हा आमच्या आर्थिक नियोजनाचे अपयश ठळकपणे समोर येते. भारतात मोगल राजे राज्य करत होते, तेव्हाही