
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या दलितमुक्तीच्या प्रयोगांनी शतकानुशतके दु:ख-दारिद्रयाच्या खाईत पडलेला मागासवर्गीय समाज माणसात आला. समाज परिवर्तनाच्या या लढाईमुळे भारतातील उपेक्षित वर्गाला आत्मभान मिळाले, हे अवघे जग जाणते. त्यामुळेच असेल कदाचित डॉ. आंबेडकरांना त्यांच्या हयातीतच देवदुर्लभ लोकप्रियता लाभली. ती आजही कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जेव्हा आनंद