
भारतीय संस्कृतीमध्ये मातृऋण, पितृऋण आणि समाजऋण मानले जाते. पूर्वीच्या काळी हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला जात असे. हल्ली कोणालाच तसे करावेसे वाटत नाही. वृद्धाश्रम हा माता-पित्यांच्या उपकारातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, असे समजणा-यांची संख्या जशी वाढत आहे, तशीच ‘फेसबुक’ वा ‘ट्विटर’वर ‘सापडणारा’ वर्ग म्हणजे समाज, असा गैरसमज दिवसेंदिवस दृढ होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कितीही