
भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अत्यंत महत्त्व आहे. आमचे तुकाराम महाराज तर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असे म्हणतात. नदीला ‘गंगा मैया’, तर जमिनीला ‘धरती माता’ मानणारे भारतीय दूध देणाऱ्या गायीलाही देवत्व देतात; परंतु प्रत्यक्षात आमच्या देशातील प्रत्येक नदी प्रदूषित झालेली दिसते. जगातील कोणत्याच देशात होत नसेल एवढी जमिनीची प्रचंड धूप फक्त भारतातच होते. एवढेच नाही तर आम्ही आमच्या