
‘अॅग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया’ म्हणजे शेती ही भारताची संस्कृती आहे, असे म्हटले जाते. पूर्वी ती वस्तुस्थिती होती. आता ती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. शंभर वर्षापूर्वी इंग्रजांनी सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असणारी ग्रामस्वराज्याची व्यवस्था मोडून काढली होती. तरीही ‘उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी’ असेच मानले जात असे. आज २१ व्या शतकात, ‘उत्तम नोकरी, मध्यम धंदा आणि कनिष्ठ