
‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येशी मिळतीजुळती आहे. जागतिकीकरणाने आता राष्ट्रीय सीमा तोडून अवघे जग एकत्र आणलेले दिसते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या न्यायाने ‘लोकल टू ग्लोबल’ असा एक सांस्कृतिक परीघ निर्माण होताना दिसतोय. ही अठराव्या शतकातील औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून सुरू झालेली आधुनिकीकरणाची प्रक्रिया आता ख-या अर्थाने स्थिरावतेय. या सगळ्या प्रक्रियेत महाराष्ट्राला