
२०१२ संपून २०१३चा प्रारंभ होत आहे. एकविसाव्या शतकातले हे पहिले तप होते. ते संपून दुस-या तपात प्रवेश करताना मनात उमटणारा प्रश्न असा की, आपण या तपभरात काय मिळवले आहे. याचे उत्तर शोधताना असे लक्षात येते की, जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणा-या आपल्या देशाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. यासाठी आजच्या तरुणांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रांत स्वत:ला गाडून तपश्चर्येला सुरुवात