
जगातील सगळयाच देशांमध्ये राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, अपवाद फक्त भारताचा. आपला देश स्वतंत्र होईपर्यंत लक्षावधी लोकांनी प्राणत्याग – स्वार्थत्याग करून लढा दिला. मध्यमवर्ग या सगळ्या लढाईत पुढे होता. अगदी सत्तरच्या दशकापर्यंत भारतीय समाजमनाला दिशा दाखवण्यासाठी लेखक, विचारवंत, संपादक, प्राध्यापक, डॉक्टर्स आणि समाजसेवकांनी भरलेला मध्यमवर्ग पुढे असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर