गंगा नदी ही तमाम भारतीयांसाठी केवळ जीवनदायिनी नाही, तर ती पापनाशिनीसुद्धा आहे. म्हणून असेल कदाचित वाराणसी मतदारसंघात पाऊल ठेवण्याआधीपासून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेले नरेंद्र मोदी यांनी गंगास्तुती सुरू केली होती. गंगा स्वच्छतेचा आणि वाराणसीच्या सर्वकष विकासाचा आराखडा घेऊन ते निवडणुकीला सामोरे गेले आणि विजयी झाले. आता गंगा सफाईचे अभियान मोदी किती गांभीर्याने आणि समर्थपणे पुढे नेतात, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल.
दिल्लीतील अण्णा हजारे आणि त्यांच्या सहका-यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, तसेच ‘निर्भया’ प्रकरणाने देशभरात उसळलेली संतापाची लाट किती जोरदार आहे, याचा अंदाज सत्ताधारी वर्गाला आला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार आणि महिला अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत. परिणामी लोकांमधील असंतोष वाढतच गेला. त्याच सुमारास महागाई आणि विविध नैसर्गिक आपत्तींमुळे सर्वसामान्य माणूस परिस्थितीच्या चरकात पिळून निघत होता. त्याला आधार देण्याची गरज होती, पण तसे झाले नाही. खासकरून जेव्हा अवघा महाराष्ट्र गारपिटीने कोलमडून पडला होता, त्या वेळी राज्याचे प्रशासन आचारसंहितेची कारणे दाखवून पाठ फिरवताना दिसले. एकूणच काय तर ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशा विचित्र स्थितीत लोक अडकले होते आणि त्याच वेळी त्यांच्या डोळय़ांसमोर भाजपने नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या न झालेल्या विकासाचे ‘मॉडेल’ उभे केले. त्यामुळे साहजिकच दु:खाने पोळलेल्या मतदारांनी काँग्रेसपेक्षा भाजपचा पर्याय स्वीकारला.
जगातील अवघी मानवजात नद्यानाल्यांच्या आश्रयाने राहिलेली आणि वाढलेली पाहायला मिळते. मानवी संस्कृतीमध्ये व्होल्गा ते गंगा हा जीवनप्रवास कशा पद्धतीने झाला, याचे अत्यंत सुरेख चित्रण राहुल सांकृत्यायन यांनी ‘व्होल्गा से गंगा’ या पुस्तकामध्ये केलेले आहे. त्या एकूण सांस्कृतिक प्रवाहामध्ये माणसे पाण्याच्या दिशेने कशी सरकत गेली आणि पाण्याबरोबर त्यांची जीवनगंगा कशी वाहत गेली, हे आपल्याला वाचायला आणि अनुभवायलाही मिळते. गेल्या अनेक शतकांपासून झालेला हा माणसांचा प्रवास, तो या गंगेच्या खो-यामध्ये आल्यानंतर स्थिरावलेला दिसतो, विशेषत: गंगेतील खो-यातील हा माणसांचा प्रवास जास्त करून काशीमध्ये आल्यानंतर गंगेबरोबर वसलेला आहे आणि त्या एकूणच मानवी जीवनाला गंगेने फक्त स्थिरता दिलेली नाही तर काशीच्या परिसरात तिला एक वेगळ्या प्रकारची संपन्नता आणि समृद्धता दिलेली दिसते. त्यामुळेच असेल कदाचित काशीतील गंगा आणि तेथील विश्वनाथ अवघ्या भारतवर्षासाठी पूजनीय बनले असावेत.
आंबा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य
घटक आहे. कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करताना आंब्याची डहाळी दारावर
लावून तयारी केली जाते. आंबा या फळाबद्दल आपल्या लोकांना इतके आकर्षण की
आम्ही तो पिकण्याची वाटदेखील पाहत नाही. कै-या तोडणे हा प्रकार जगात
तुम्हाला कुठे आढळणार नाही, भारतात मात्र कैरीचं लोणचं, पन्ह, आंबाडाळ असे
एक ना अनेक प्रकार केले जातात आणि हापूससारखा आंबा तर सगळ्यांना खुणावतो,
पण गावरान झाडावर पिकलेला मुठीएवढा आंबा खाणे हा तर वेगळाच आनंद. आजही अनेक
घरात सर्वानी एकत्र बसून अमरसाचा आस्वाद घेणे ही पर्वणी असते. आंब्याचे एक
वैशिष्टय़ ते म्हणजे, त्याचे चाहते समाजाच्या सर्व थरांत बघायला मिळतात.
गरीब असो वा श्रीमंत सगळ्यांना या कोकणच्या राजाचे भलतेच आकर्षण. अवघ्या
जगाला आपल्याकडे आकर्षित करणा-या या फळांच्या राजाला २८ देशांच्या युरोपीय
संघाने दरवाजे बंद केले आहेत. आमच्या आमराजाची ही दयनीय स्थिती का झाली?